
इतकी वर्षे उलटल्यानंतरही, परमहंस योगानंद यांची जीवनगाथा, योगी कथामृत लाखो लोकांसाठी भारताच्या प्राचीन यौगिक ध्यानाच्या शिकवणींचा परिचय करून देण्याचे काम करीत आहे. विभिन्न क्षेत्रांतील सुप्रसिद्ध व्यक्तींद्वारे प्रशंसित जसे: भारतीय सतार वादनपटू स्वर्गीय रविशंकर, भूतपूर्व ॲपल सीईओ स्टीव जॉब्स, भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली, तसेच
आणखी इतर कित्येक लोक, हे पुस्तक जगभरातील वाचकांना प्रेरित करत आहे. पन्नास पेक्षा अधिक भाषांमध्ये मुद्रित, ह्या पुस्तकाला “20व्या शतकातील 100 सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक
पुस्तकांतील एक” असा दर्जा दिला गेला आहे.
सध्या आम्ही योगी कथामृत ची निःशुल्क eBook ची एक प्रत प्रदान करत आहोत. कृपया आपला ईमेल पत्ता आणि आपल्या भाषेची पसंती नोंदवावी. मग आम्ही आपल्याला
निःशुल्क प्रत ईमेल करू.
निःशुल्क eBook डाउनलोड करा
(ही संधी केवळ भारत, नेपाळ आणि श्रीलंकामध्ये २२ जून २०२५ पर्यंत उपलब्ध आहे)
आपली माहिती द्या
कृपया लक्षात घ्या की केवळ भारत, नेपाळ आणि श्रीलंका येथूनच निःशुल्क eBook
डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.

प्रशस्तिपत्रे
मला हे पुस्तक प्रिय आहे. अशा सर्वांनी हे पुस्तक अवश्य वाचले पाहिजे, जे आपल्या विचारसरणीला आव्हान देण्याचे साहस ठेवतात. ह्या पुस्तकातील विद्यमान ज्ञानाची समज आणि त्याचे कार्यान्वयन आपल्या संपूर्ण जीवनाला बदलून टाकेल. ईश्वरावर विश्वास ठेवा आणि सत्कर्म करत पुढे चालत रहा. 😇#onelove #begrateful #helponeanother
"एका प्रत्यक्ष पाहिलेल्या साक्षीदाराद्वारे आधुनिक हिंदू संतांच्या असाधारण जीवन कथांचे आणि अलौकिक शक्तींचे वर्णन असलेल्या ह्या पुस्तकाचे समयोचित आणि सर्वकालिक असे दोन्ही दृष्टींनी महत्त्व आहे…. पश्चिमेकडे प्रकाशित झालेल्या पुस्तकांमधील हे एक पुस्तक, हिंदू संतांची असाधारण जीवनकथा, भारताच्या आध्यात्मिक संपदेवर निस्संदेह सर्वाधिक प्रकाश टाकणारे आहे"
"अत्यंत आकर्षक रूपात सरळ आणि स्वतःला उघड करणाऱ्या जीवनांपैकी एक… ज्ञानाचे एक वास्तविक भांडार. ज्या महान विभूतींशी ह्या पानांमध्ये भेट होते… ते गहन आध्यात्मिक ज्ञानाने संपन्न मित्रासारखे आठवणीत राहतात, आणि ह्या सगळ्या महान विभूतींमधील एक आहे, ईश्वरोन्मत्त लेखक स्वतः."
"सुप्रसिद्ध योगी कथामृत पुस्तकामध्ये योगानंदजी यौगिक ज्ञानाच्या अभ्यासाने उच्चतम पातळीवर प्राप्त होणाऱ्या, ब्रह्माण्डीय चेतनेचे अप्रतिम विवरण करतात. अनेकविध आश्चर्यकारक मानवी स्वभावाचे यौगिक आणि वेदान्तिक दृष्टीकोनातून विवरण केले आहे."